नामदेवांचा जन्म 1269 मधे झाला होता. ते महाराष्ट्रात, भारतातील हिंदु परंपरेचे प्रसिद्ध धार्मिक कवि होते, आणि मराठी भाषेत लिहिणार्या लेखकांमधून एक होते. त्यांचा जन्म एक शिंपी कुटुंबात झाला होता, जे पंढरपुरच्या विट्ठलाचे मोठे भक्त होते. त्यांच कौटुंबिक व्यवसायात व संसाराकडे लक्ष कमी असे. 11 वर्षाचे असताना त्यांच लग्न झालं व त्यांना चार आपत्य होती. त्यांच्या वडिलांच नाव दामाशेट्टी व आईचं नाव गोणाई होतं.
त्यांना दिवसनरात्र विट्ठलभक्तीचाच छंद होता. नामदेवांसाठी प्रत्येक गोष्टीची सुरुवात व अंत म्हणजे फक्त विठोबा. एकदा नामदेवांची आई काही कामात होती, तीने नामदेवाला विठोबाला नैवेद्य दाखवून यायला सांगितलं. नामदेव मंदिरात गेले, विठोबा समोर त्यांनी नैवेद्याच ताट ठेवले व त्यांना नैवेद्य खाण्यासाठी प्रार्थना केली. काही वेळा पर्यंत तो नैवेद्य स्वीकार केल्याची त्यांना काही खूण दिसली नाही, तर ते एवढ्या काकूळतेनी रडले की विठोबांनी माणसाच्या रूपात खरोखर येऊन नैवेद्य ग्रहण केला.
त्यांनी हिंदी व पंजाबी भाषेत पण काही कविता लिहिल्या. त्यांच्या एकसष्ठ रचनांचा सिक्खांच्या पवित्र ग्रंथ, गुरु ग्रंथ साहिबांमधे समावेश झालेला आहे. नामदेवांच्या भक्तिमय रचना (“अभंग”), यांचा संग्रह नामदेवांची गाथा या दस्तावेजात झाला आहे. ‘तीर्थावली’ नावाच्या संग्रहात त्यांच्या संत ज्ञानेश्वरांच्या बरोबर केलेल्या यात्रेविषयी वर्णन आहे.
बर्याच भक्तीग्रंथांमधे त्यांच्या कीर्तनांचा संदर्भ आहे. ह्या वरून ते चांगले शिकलेले व मोठे विद्वान होते ास म्हणू शकतो. त्यांचे कीर्तन फार प्रभावी होते, ते म्हणायचे –
नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे देव पांडुरंग
(नामदेव कीर्तन करत असताना, त्यांच्या समोर देव पांडुरंग नाचत असे)
नामदेवाच्या जीवनात एक घटना घडली. एक दिवशी नामदेव बाजारात काही कापडं विकायला निघाले. ते एका दगडावर भजन करत बसले, व आपण कापड विकायला आलो होतो या गोष्टीचा त्यांना अगदीच विसर पडला. काही घटकांनंतर सूर्यास्त झाला व त्यांना आठवण झाली की आपण कापड विकण्या करिता आलो होतो व आता ते विकले गेले नाही म्हणून घरी वडिलांचा ओरडा खावा लागेल. त्यांनी काय केले की ते सर्व कापडं ते ज्या दगडावर बसले होते त्यालाच विकून दिले, म्हणजे की त्या दगडा वरच सोडून दिले, व दूसर्या एक दगडाला हमी द्यायला म्हणून नेमलं की पहिला दगड दूसर्या दिवशी त्यांना पैसे देईल, आणि ते मंदिरात जाऊन बसले.
नामदेवांचे वडिल त्यांच्या मुलाचे हे अद्भुत कार्य ऐकून संतापले व त्यांनी त्या धोंड्याला (अर्थात् त्या दगडाला, महाराष्ट्राच्या काही लोकांमधे धोंड्या हे नाव पण असतं) आणायला सांगितले ज्याने पैसा देण्याची बहादारी दिली होती. दूसर्या दिवशी नामदेव परत बाजारात गेले आणि बघितलं की रात्रभरात सर्वे कापडं तेथून नाहीसे झाले होते, दूसर्या दगडाला (धोंड्या) त्यांनी घरी आणलं, जसे काही त्याने पैसे द्यायला नकारा दिला होता असे समजून त्याला एका खोलीत बंद करून ठेवले. त्या नंतर ते मंदिरात गेले व विठोबाला सर्व हकीकत सांगितली व आपली अडचण पण सांगितली. नामदेवांच्या वडिलांनी त्यांना तो पैसे देण्याची हामी देणारा धोंड्या दाखविण्यास सांगितले, नामदेवांनी उत्तर दिले की त्याला घरात एका खोलीत बंद केलं आहे व स्वतः पुन्हा मंदिराकडे निघून गेले. वडिलांनी जसेच पैसे मागण्या करिता खोलीचं दार उघडलं, समोर सोन्याची एक लगडी बघून ते आश्चर्यचकित झाले. वडिलांना अतिआनंद झाला; पण नामदेवांना याचा लेशमात्र लोभ वाटला नाही. त्यांनी देवाचा फक्त या गोष्टी साठी आभार मानला की त्यांना देवानी मार खाण्यापासून वाचवलं.
नामदेव वीस वर्षाचे होते तेव्हां त्यांची भेट महान संत ज्ञानेश्वरांशी पंढरपुरला झाली. ज्ञानदेव सहजपणे विठोबाच्या या महान भक्ताला भेटून खूब आनंदित झाले. त्यांनी नामदेवांना आपल्यासोबत विविध भक्तीस्थानांची यात्रा करण्यास घेतले. नामदेवाच्या जीवनाचा हा खूप महत्वपूर्ण काल होता. या काळापासून व्यावहारिक दृष्ट्या, दोन महान संत मृत्युपर्यंत बरोबर राहिले. त्यांची तीर्थयात्रा भारताच्या सगळ्या भागांपर्यंत व जवळजवळ सगळ्या पवित्र तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचली.
रस्त्यात, नामदेव व ज्ञानदेवांनी कित्येक चमत्कार दाखविल्याचा उल्लेख आहे. जसे की – नामदेव आणि ज्ञानदेव नागनाथपुरीला आले. नामदेवांनी मंदिरात भजनाला सुरुवात केली. तेथे विशाळ गर्दी जमली. मंदिराचे मुख्य पुजारी मंदिरात प्रवेश करू शकत नव्हते म्हणून त्यांचा संताप झाला. नामदेव त्या मंदिराच्या पश्चिमद्वारेवर जाऊन बसले व रात्रभर भजनकीर्तन केले. चमत्कार असा झाला की मंदिरातील प्रतिमा आपल्याआप त्यांच्या कडे वळून गेली.
अशीच एक घटना कर्णाटकाच्या उडुपी मंदिराची पण आहे. तिथलचे देव श्री कृष्ण, यांच तोंड इतर मंदिराच्या मुर्तीसारखे नसून, पश्चिमेकडे आहे. उडुपीचे तीर्थयात्री संत कनकदासाविषयी एक कहाणी प्रसिद्ध आहे. ते खालच्या जातीचे असून, परंपरेनुसार त्यांना मंदिरात प्रवेशण्यास नकार करण्यात आला व दर्शन घेऊ दिले नाहीत. कृष्ण कनकदासाच्या भक्तीने आनंदित झाले व त्यांची प्रतिमा मंदिराच्या पश्चिमीभागी वळून गेली कारण कनकदास मंदिराच्या पृष्ठभागी भजन गात होते. मागून पश्चिम भागाच्या भींतीशी एक लहानशी खिडकी बनवण्यात आली जेथून कनकदास कृष्णाचे दर्शन बाहेरूनच, या खिडकीतून (नवग्रह कितिकी) करु शकतो, ज्यावर कलात्मक कोरीव काम केलेल्या चांदीच्या पतर्याचे आवरण आहे. कृष्णाच्या प्रतिमेजवळ एक दिवा जळत असतो, हा दिवा श्री माधवचार्यांनी लावला होता व तेव्हांपासून आजपर्यंत तो तेवत आहे.
नामदेवांनी कोणत्याही मोठ्या ग्रंथाची रचना केली नाही; पण त्यांनी देवाची भक्ती व प्रेमाने परिपूर्ण असे अनेक अभंग व लघुकाव्यांची रचना केली. त्या अभंगात एक अपूर्व गोडवा आहे. ह्यातले मोठ्या प्रमाणात तर हरवले, पण तरीही सुमारे चार हजार अभंग अजून ही आहे, जे आजही त्याला वाचणार्यासांठी प्रेरणास्रोत आहे. काही अभंगांचा समावेश सिख आदि ग्रंथात पण झालेला आहे.
नामदेवांनी दिलेल्या संदेशात मूलतत्व हे आहे: “देवाच्या नावाचा नित्य जप करा. त्याच्या कीर्तीचे श्रवण करा. हृदयातील देवाचे ध्यान-आराधना करा. देवाची सेवा करा. त्याच्या कमलाचरणी डोकं ठेवा. कीर्तन करा. तुमची भूक तहान सर्व तुम्ही विसरून जाल. देव तुमच्या अगदी जवळच असेल. तुम्हाला अमरत्व आणि शाश्वत परमानंदाची अनुभूति होईल”.
ते पंजाब मधे वीस वर्ष राहिले व त्यांनी तेथे अभंगांची रचना केली जी सिख आदि ग्रंथांमधे देखील आहे. या जगात जगण्याची इच्छा नसून त्यांनी सव्हिसाव्या वर्षी पूर्ण कुटुंबासोबत पंढरपुरला समाधि घेतली. त्यांची समाधि ‘नामदेव पायरी’ म्हणून ओळखली जाते.
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकल हरिचिया दासा ॥
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी । ही संत मंडळी सुखी असो॥
-चांदोबा

Nice information......Thanks
Shri sant nama Dev maharaj ki jay