नागपुर

भारताची संतर्‍यांची राजधानी म्हणून नावजलेले नागपुर हे महाराष्ट्रातील महत्वपूर्ण शहर आहे. ह्या शहराचे नाव नाग नदी वरून पडलं, जी नागपुरच्या जवळून वाहते.

देवगडच्या गोंड राजा, “बख्त बुलंद शाह” ह्यांनी 1703 मधे या शहराची निर्मिती केली. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने 19व्या शतकात ह्या शहराचा ताबा घेतला.
भारताच्या उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम मार्गाच्या केन्द्रावर, रस्त्यामार्गी, रेलमार्गी व विमानमार्गी, प्रत्येक दृष्टिने मध्यभागी असल्यामुळॆ नागपुरला एक वेगळच महत्व आहे.

मारबत उत्सव नागपुर क्षेत्रांत, विशेष करून नागपुर शहरात साजरा करण्यात येतो. लोक दैत्य शक्तिचा पुतळा तैयार करतात व त्याची मिरवणूक काढण्यात येते. ह्या पुतळ्याच शेवटी दहन करण्यात येतं व अस मानलं जातं की आता सगळ्या वाईट शक्तींचा नाश झाला. त्यानंतर शहर सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून मुक्त झालं.

नागपुरच्या जवळचे काही प्रेक्षणीय स्थळ:

अदासा -   प्राचीन व भव्य मंदिराचा गट.

खेकरानाला खेकरानाला खापरा रेंज जंगलातली एक डेम साइट आहे. हे क्षेत्र वर्षभर हिरवळ, नैसर्गिक सौन्दर्य व सुंदर वातावरण आणि मनमोहक हवामानामुळे आकर्षित करतं. जळाशय दोन्ही बाजुंनी गाढ जंगलाने आच्छादित असतात.







 धापेवाडा, खिंडसी आणि आंबाझरी तलाव – चंद्रभागा नदीच्या किनार्‍यावर एक शांत स्थानावर विठोबाच एक छोटस मंदिर आहे. ह्या भागी विभिन्न प्रकारचे पाण्याचे खेळ खेळता येतात. हे स्थान विदर्भातील पंढरपुरच्या नावानी ओळखल जातं.

पयनार – धाम नदीकांठी असलेल पावनारच एक ऐतिहासिक गाव, ज्याच नाव सुप्रसिद्ध राजपुत राजा पवन वरून ठेवण्यात आलं. हे एक आश्रम स्थान आहे, ज्याचा शोध महान सामाजिक उद्धारक आणि कार्यकर्ते आचार्य विनोबा भावे ह्यांनी कोढ्यांचे रोग्यांची सेवा करण्यास केला- आणि हे गांधी कुटीचे स्थान पण आहे.

सेवाग्राम – मूळ शेगांव, गांधीजींनी ह्या गावाची निवड त्यांचा सामाजिक सेवेसाठी केली त्यानंतर शेगांव हे नाव बदलून सेवाग्राम ठेवलं आणि गांधी आश्रमची स्थापना झाली. आश्रम जे की महान नेत्याच्या व्यक्तिगत आठवणींच स्थान आहे, त्या व्यतिरिक्त ज्ञानमंदिर पण एक पहाण्यालायक स्थान आहे.

मार्कंड - यात्राळुंच्या प्रवासात मार्कंड हे अगत्याच स्थान आहे. वाइगंगेच्या किनार्‍यावर असलेल्या या शहराचे नाव इथे राहून भक्ति करणार्‍या संत मार्केंडेयच्या नावावरुन पडल आहे. ह्या मार्कंड मंदिरासकट आणखी 24 हून जास्त मंदिर आसपासच्या क्षेत्रात असलेले हे निशंकपणे एक आध्यात्मिक पात्र आहे. ह्या मंदिराच्या स्थापत्यात खजुराहोची शैली आढळते, पण ह्याच बांधकाम नक्की किती वर्षा अगोदरच आहे त्या विषयी काही माहिती सापडत नाही.
0 Responses