पूणे


सह्याद्रीच्या मनोरम्य जागेत वसलेल पूणे, हे परंपरा आणि आधुनिकतेच सुंदर प्रतीक आहे.

पूणे हे आधि पूना म्हणवल जात होत, हे मुंबई पासून 150 किमी दक्षिणेत आहे, आणि हे भारताच्या ऐतिहासीक शहरांमधल एक आहे. महाराष्ट्रातल दुसर्‍या नंबरच मोठ शहर आहे.

शहरातील ऐतिहासीक संस्था शिवाजी महाराज, पेशवा आणि लोकमान्य टिळकांशी संबंधित आहे. पूणे शहर एडी 937 पासून वास्तव्यात आलेल आहे अस म्हणतात. 1730 मधे, सतार्‍याचे छत्रपतिचे पंतप्रधान, पेशवांमुळे हे एक महत्वपूर्ण राजकीय केन्द्र म्हणून अस्तित्वात आल. ब्रिटिश राज्यकाळात, 1817 मधे, ह्याची पसंदगी एक लश्करी छावणी म्हणून करण्यात आली होती व बॉम्बे प्रेसिडेंसीची “मॉंनसून राजधानी” म्हणवली जात असे.

अनेक शैक्षणीक आणि संशोधन संस्थान असल्यामुळे ह्याला भारताच ऑक्सफॉर्डॅ पण म्हणतात आणि अनेक उत्पादक कंपनी, विशेष करून मोठ्या ऑटोमोबाइल कंपन्यामुळे, व त्यांच्या शहरातील महानगरीय विस्तारातील वास्तव्यामुळे पूण्याला डेट्रोइट देखील म्हणतात.

पूणेच्या आधुनिक जीवनशैली व त्यातील व्यावसायिक केन्द्रामुळे, हे सूचना प्रोद्योगिकीच्या महत्वपूर्ण विकासासाठी मुख्य शहर आहे. सार्‍या औद्योगिकीकरणामुळे हे शहर पर्यटकांच देखील मनपसंत लक्ष्यांक आहे.

लाल देउळ, ओशो इंटरनेशनल कॉम्युन, आगा खां महल, पाताळॆश्वर गुफा मंदीर, सिंहगढाचा किल्ला वगेरे पूण्यातील दर्शनीय स्थळ आहे.


लाल देउळ:

पूण्यातील मोलेदिना रोड वर स्थित, लाल देउळ हे महाराष्ट्रातील सुंदर देवळांपैकी एक आहे. ह्याची रचना 1867 मधे, परोपकारी डॆविडच्या शासनकालात झालेली आहे. इंग्रजी गोथीक शैलीत बांधलेले, लाल वीटा आणि पत्थरांना कोरून ह्या चर्चची रचना झालेली आहे.

पातालेश्वर गुफा मंदीर

पातालेश्वर गुफा मंदीर , आठव्या शतकातलं एक अखंड खडकाच कोरीवकाम आहे, पूण्यातील शिवाजी नगरच्या जंगली महाराज रोडच्या मध्यभागी असलेले हे ऐतिहासीक मंदिर आहे. हे मंदिर एका मोठ्या दगडातून बनलेले आहे व त्यात पातालेश्वर देवाची स्थापना झालेली आहे. हे मंदिर मोठ्या दगडी खांबावर आहे व त्याचे स्थापत्य मुंबईच्या एलिफन्टा केब्झ सारखे अतिसुंदर आहे. मंदिर शिवाच असून मंदिराच प्रवेशद्वार नंदी मंडपने सुशोभित केलेल आहे.

 पौराणिक कथा अशी आहे की विश्वात्मक गुरुदेव, ज्यांना जंगली महाराज म्हणून ओळखण्यात येते, हे विश्व शक्तिरूप ब्रह्मा, विष्णु, आणि महेश ह्यांचा अवतार आहे. आणि त्यांची महाराष्ट्राच्या अक्कलकोट जवळ, योगानुयोगे स्वामी समर्थांशी भेट झाली, आत्ता पर्यंत ते स्वतःच्या आद्यात्मिक शक्तिचा उपयोग फक्त निर्दोष लोकांना त्रास द्यायला करत होते, स्वामींच्या सलाहनी ते एक सामान्य माणसाहून बदलून गेले. मग ते उग्र तपश्चर्या करायसाठी जंगलात गेले, म्हणून त्यांच नाव ‘जंगली महाराज’ अस पडलं.

रामटेक किला मंदिर

रामटेक किला मंदिराचा यशाची एक पौराणिक कथा आहे. ह्या जागेविषयी अस मानल जात की रामानी लंकावर चढाई करण्यापूर्वी येथे विश्राम घेतला होता. रामटेक किला मंदिर हे रामाचा देवत्वा एवढच जूनं आहे.

सिंहगढाचा किला

सिंहगढाचा अर्थ आहे ‘सिंहाचा किला’ (Marathi: सिंहगड), ह्याला अगोदर कोन्धण असे म्हणत होते, हे एका टेकरीवर स्थित आहे जी आसपासच्या प्रदेशाहून 800 मीटर उंचावर आहे.  इतिहासात ह्या किल्ल्याच खूप महत्व आहे.

ह्या किल्ल्याला परत मिळविण्या करता, छत्रपति शिवाजी ह्यांचे सेनापति ‘तानाजी मालुसरे’ ह्यांनी 1670 मधे चढाई केली. ह्या लडाई मधे तानाजींचा मृत्यु झाला, पण त्यांचे भाउ सुर्याजींनी कोन्दण वर कब्जा केला. तानाजींची मृत्यु झाली हे ऐकून त्यांच्या मानार्थ ह्या किल्ल्याच नाव ‘सिंहगड’ पडल, कारण तानाजींच टोपण नाव सिंह होत. ह्या लडाई मधे तानांजीच्या बहादुरीला बिरदावण्या करिता किल्ल्यावर तानाजींचा पुतळा स्थापित केलेला आहे. आपण किल्ल्यावर तानाजींची समाधि पण बघु शकता.

20व्या शतकात, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य सेनानी, ह्यांनी किल्ल्यावर एक बंगला बांधला.

                                                                                                                                  -चांदोबा 
0 Responses